Sunday, September 17, 2006

“प्रेम कर भिल्लासारखं “
पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तीत-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...
-कुसुमाग्रज
सांगा कस जगायचं?कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
डोळे भरुन तुमची आठवणकोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घासतुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!
कळ्याकुट्ट कळोखातजेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरीदीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!
पायात काटे रुतुन बसतातहे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतातहे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!
पेला अर्धा सरला आहेअसं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहेअसं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!
सांगा कस जगायचं?कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

माझ्या आवडत्या कविता

देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे
गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे, जे कोंडिती साऱ्या नभा
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा
देखणे ते ओठ कि जे, ओतिती मुक्तफळे
आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे
देखणी ती पाउले, जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनसुध्दा, स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध जां ये, सूळ नेता स्वेच्छया
लाभ्ला आदेश प्राणां निश्चये पाळावया
देखणी ती जीवने, जी तृप्तिची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाहे, शुभ्र पाऱ्यासारखे
देखणा देहान्त तो, जो सगरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरुन जातो रात्रगर्भी वारसा