Sunday, September 17, 2006

माझ्या आवडत्या कविता

देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे
गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे, जे कोंडिती साऱ्या नभा
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा
देखणे ते ओठ कि जे, ओतिती मुक्तफळे
आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे
देखणी ती पाउले, जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनसुध्दा, स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध जां ये, सूळ नेता स्वेच्छया
लाभ्ला आदेश प्राणां निश्चये पाळावया
देखणी ती जीवने, जी तृप्तिची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाहे, शुभ्र पाऱ्यासारखे
देखणा देहान्त तो, जो सगरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरुन जातो रात्रगर्भी वारसा

No comments: